Uncategorized

अतिवृष्टीने शेतकरी हतबल, पण विमा कंपन्या ‘नॉट रिचेबल’!

शहरातील शेतकऱ्यांत तिव्र असंतोष ;शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Story Highlights

  • अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातील सोयाबिनचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब फुटले आहेत.परंतु अजुनही नुकसानाची पाहणी झाली नाही.विमा कंपनीशी संपर्क केला असता कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नाही. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. संदीप नामदेवराव देशमुख (युवा कास्तकार, शिरपूर जैन)

अतिवृष्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, हळद, भाजीपाला इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या टोल फ्री नंबरवर संपर्क केला असता सदर टोल फ्री नंबर ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे शेतकरी बांधवात तिव्र असंतोष पसरला आहे.

शिरपूर व परिसरामध्ये मागील दहा दिवसांपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन पावसामुळे खराब होऊन प्रचंड नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे तुरीचे पिक करपले आहे. हळद पिकाला सुद्धा फटका बसला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतातच सडला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाचा विमा काढलेला आहे.पण शासकीय यंत्रणेनी अद्यापही शेत सर्वेक्षणाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच धास्तावला आहे. या संकट समयी कोणीच आपल्या साथीला नाही, ही काळजी शेतकऱ्यांचे काळीज कुरतडत आहे.म्हणूनच या दिवाळसणात सुखाचे दोन घास शेतकऱ्यांच्या घशाखाली उतरले नसल्याचे भीषण वास्तव पंचक्रोशीत अनुभवायला मिळत आहे.

शेतीचे नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील प्रपत्र तत्काळ उपलब्ध माहितीचा आधारे भरून संबंधित विमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर वर संपर्क केला.परंतु विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक ‘नॉट रिचेबल’ आहेत किंवा फोन लागल्यावर कर्मचारी फोन उचलत नसल्याचे शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

 शेतात माल नाही व विमाही नाही, अशा विवंचनेत संदीप नामदेवराव देशमुख या जागरुक युवा शेतकऱ्याने थेट वाशीमचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांना संपर्क करून त्यांच्या कानावर सदर प्रकार घातला आहे. विमा कंपनीने विम्याचे हप्ते घेतले.पण या अस्मानी संकटात शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे.महसुल विभागाने अद्यापही नुकसानाची पाहणी सुरु केली नाही.त्यामुळे शासनाने सदर प्रकरणी कंपनीवर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळवून द्यावा,अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: