Uncategorized

सिंधुबाई सोनोनेंनी आपल्या सुनांचेच केले ‘लक्ष्मीपूजन’

सासूबाईंचा प्रेरणादायी उपक्र

घरातील महीला हिच खरी लक्ष्मी असल्याचे मत

स्नुषापूजन कार्यक्रमाचे सर्व स्तरातून झाले कौतूक

वाशिम – (दि. 28 ऑक्टोबर 2019 )
दिवाळीच्या दिवशी सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जात असतांना महापूरूषांच्या विचारांचा वारसा घेऊन त्याप्रमाणे वाटचाल करणार्‍या सासूबाईंनी आपल्या सुनांनाच लक्ष्मी मानून त्यांचे पूजन करून साडीचोळी भेट देत अनोख्या पध्दतीने दि. 27 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली.
या आगळ्यावेगळ्या स्नुषापूजन कार्यक्रमाचे सर्वत्र कौतूक झाले.
आनंद, उत्साह व जल्लोषाचे प्रतिक म्हणून पारंपारीक पध्दतीनूसार दिवाळी हा सण साजरा केला जातो. परंतू बलीप्रतिपदेच्या दिेवशी दानशूर अशा प्रजावत्सल बळीराजाचा बटू वामनाने कपट नितीने खुन केला. म्हणून समस्त कृषीप्रधान शेतकरी तथा बहूजनांच्या पराभवाचा हा दिवस असल्याने परिवर्तनवादी विचारसरणीचे लोक दिवाळी दरम्यान बळीराजा स्मृती महोत्सव साजरा करतात. सोतबच घराला घरपण देणारी महीला हिच खरी लक्ष्मी असल्याचे मानून मूर्तीच्या लक्ष्मीचे पूजन करण्याऐवजी आपल्या पत्नीचे व सुनांचे पूजन करण्याची प्रथा जिल्ह्यात रूढ होत आहे.
अपवाद वगळता घरातील कूठल्याच निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी केले जात नाही. महिलांना त्यांच्या स्वत:च्या लग्नामध्ये केवळ पूजा व सन्मान केला जातो नंतर मात्र कधीही त्यांचे पूजन केले जात नसल्याची वस्तुस्थीती आहे. ज्या स्त्रीला घरात लक्ष्मी म्हणून बूजूर्ग व्यक्ती उल्लेख करतात मात्र प्रत्यक्षात तिला लक्ष्मी म्हणून सन्मान दिला जात नसल्याचे वास्तव आहे. दुय्यम दर्जाची म्हणून तिला कायम उपेक्षित ठेवले जाते. अशा या वातावरणात बहूजन संत तथा महापूरूषांनी दिलेला स्त्री-पूरूष समानतेचा वारसा जपण्याचे काम काही कुटुंबातुन होतांना दिसुन येत आहे.

वाशीम शहरातील ड्रीम लँड सिटी या कॉलनीत राहणाऱ्या सिंधुबाई सुभाष सोनोने यांनी आपल्या सुनांना घरातील लक्ष्मी चा दर्जा दिला आहे. त्यांच्यावर निरंकारी मिशन च्या सुदीक्षा सविंदर हरदेवजी यांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांचा पगडा आहे. याच विचारातुन त्यांनी गौरी सणाच्या वेळी आपल्या सुनांना लक्ष्मीचा दर्जा देऊन त्यांची पूजा अर्चा केली होती. रविवारी दिवाळी निमित्त सर्वत्र मूर्तीच्या लक्ष्मीचे पूजन केल्या गेले. मात्र सिंधुबाई सोनोने यांनी आपली थोरली सून व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका सौ. रेखा सचिन सोनुने व धाकटी सून सौ. पल्लवी प्रमोद सोनोने यांना देव्हाऱ्यात विराजमान करून त्यांची मनोभावे पूजा अर्चा केली , जेवू घातले व दर्शन घेतले. तसेच त्यांचे चिरंजीव सचिन व प्रमोद सोनोने यांनी सुद्धा आपल्या पत्नीचे पूजन केले. व त्यांना साडीचोळी भेट दिली. या प्रेरणादायी व चूकीच्या रूढी परंपरांना छेद देऊन सत्याचा मार्ग दाखविणार्‍या उपक्रमाची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: