Uncategorized

आरोग्य वर्धिनी केंद्र शिरपूरचा कारभार वाऱ्यावर !

आरोग्य अधिकारी मोकाट ;जनतेचे आरोग्य वाऱ्यावर

Story Highlights

  • संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिबाबत मी लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारला असता कायम असमाधान कारक उत्तरे दिली. वरिष्ठ अधिकाऱ्याना अनेक वेळा हा प्रकार लक्षात आणून दिला तरीही संबंधित अधिकारी यांच्या वागणुकीत काहीही फरक नाही त्यामुळे जनतेच्या तक्रारी लक्षात घेता जनआंदोलन करावे लागेल तरी प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेत आरोग्य अधीकरी श्रीकांत करवते यांना मुख्यालयी राहणे बंधन कारक करावे. – सौ. कल्पना विजय अंभोरे मा. पं.स.सदस्या

लोकप्रतीनिधिचे अक्षम्य दुर्लक्ष

शिरपूर  दि.  २७ ऑक्टोबर २०१९  

शासनाने शिरपूर जैन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची 3 कोटी रुपये खर्चू करून नवीन इमारत बांधली व आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले. आता आरोग्य केंद्राचा कारभार नवीन इमारतीमध्ये चालतो  मात्र आरोग्य अधिकारी हे वरिष्ठांच्या पाठीब्यावर नेहमीच अनुपस्थित असतात. त्यामुळे रुग्णाची मोठी गैरसोय होत आहे.

शिरपूर येथील आरोग्य अधिकारी हे नेहमीच गैरहजर आसतात ते मुख्यालयी राहत नसून शहराच्या ठिकाणावरून अपडवून करतात त्यामुळे कर्तव्यावर वेळेवर न पोहचणे, किंवा दांडी मारणे व दूपारीच निघून जाणे असे प्रकार नित्याचेच असतात. येथे 25 ते 30 खेड्यातील रुग्ण येतात, शिवाय पोलीस स्टेशन मधील आरोपीचे,जखमींचे वैद्यकीय तपासणी आरोग्य आधीकार्यास करावी लागते. कित्येक वेळा जखमीस ,आरोपिस तासनतास आरोग्य अधिकाऱ्याची वाट पाहत बसावे लागते. अनेक वेळा परिचारकांचा कारभार त्यांचे पती पाहत असून ते रुग्णांवर उपचार करीत असल्याचे प्रकार घडलेले आहेत.

त्यामुळे सदर रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मोठया अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वेळा येथील नागरिकांनी वरिस्ट अधिकाऱ्यांच्या कानावर सदर प्रकार टाकला परंतु वरिस्ट अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे या आरोग्य अधिकाऱ्याचा मनमानी कारभार चालू असून वरिस्ट अधिकाऱ्याचे जाणीवपूर्वक या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे .

दररोज रुग्णांना व नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णाच्या व नागरिकांची होणारी हेळसांड थांबवण्याकरिता स्थानिक  लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या भोंगळ कारभाराला वचक बसून रुग्णांची होणारी हेळसांड थांवाण्याकरिता शासन व प्रशासन स्तरावरन त्वरित दखल घेणे गरजेचे आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवणारे वरिस्ट अधिकारी व राजकीय पदाधिकारी ‘तेरी भि चूप मेरी भी चूप’ या तत्वा नुसार त्यांची पाठराखण करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .

संपर्क – ९९७०९५६९३४ ब्राईट कॉम्पुटर शिरपूर जैन

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: