Uncategorized

शिरपूर येथे भर पावसात उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवदुर्गा विसर्जन

शिरपूर: दिनांक ०८ (प्रतीनिधी)

नवदुर्गा विसर्जन मिरवणूक व्हिडीओ बघा शेअर करा

नऊ दिवस आदिशक्ती देवीची पूजा केल्यानंतर विजयादशमीच्या आदल्या दिवशी ७ ऑक्टोबरला  मोठय़ा उत्साहात शिरपूर येथील ठिकठिकाणच्या १० मंडळांकडून दुर्गामूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या वेळी दुर्गा उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी ढोलताशांच्या गजरात तसेच गुलाबपुष्प उधळत देवीच्या मूर्त्यांचे विसर्जन केले. विसर्जनाची प्रक्रिया रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. 
             हिंदू धर्माशास्त्रानुसार आदिशक्तीच्या नऊ रुपांचे नवरात्रीमध्ये मनोभावे पूजन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार २९  सप्टेबर  रोजी घरोघरी घटस्थापना तसेच १४ सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गा देवी, भवानी, जगदंबा अशा देवीच्या विविध रूपातील मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नऊ दिवस सातत्याने सकाळ-संध्याकाळ पूजा, आरती करून आदिशक्तीच्या या देवीरूपांची आराधना करण्यात आली. या दरम्यान, सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांनी विविध उपक्रम देखील राबविले. काही ठिकाणी गरबा कार्यक्रम घेऊन देवीचा जागरदेखील करण्यात आला. 
आई भवानी देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रीनिमत्ताने मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. या ठिकाणी भाविकांनी मनोभावे देवीचे दर्शन घेऊन आपल्या मंगलमय जीवनाची कामना केली. या सर्व सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांमध्ये नऊ दिवस धार्मिक व सामाजीक उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान, दुर्गा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख तयारी करण्यात आली होती. कोणतीही अनुचित घटना घडून सामाजीक सद्भाव बिघडू नये, यासाठी पोलिस विभागाच्या वतीने सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नवरात्रोत्सवानिमित्ताने सगळीकडे भक्तिमय वातावरण या काळात दिसून आले. अनेक ठिकाणी होम-हवन तसेच देवीचा जागरदेखील करण्यात आला, तसेच विसर्जनाच्या दिवशी म्हणजे ०७ ऑक्टोबरला आई भवानी संस्थान येथे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी आस्वाद घेतला.
०७ ऑक्टोबरला सकाळपासूनच देवीच्या विसर्जनाची तयारी मंडळांच्या कार्यकर्त्यां कडून करण्यात येत होती.परंतु दुपारी पावसाने सुरुवात केल्याने मिरवणूक काही काळ बंद होती. सुरुवातीला भर पावसात उत्साही भक्त आनंद वूअक्त करीत नृत्य करीत होते परंतु पावसाचा जोर वाढल्यावर वाद्य बंद करावी लागली. संत सावतामाळी नवदुर्गा उत्सव मंडळ,औंढा नागनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ, संत ज्ञानेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळ, मराठा नवदुर्गा उत्सव मंडळ ,जय संभाजी नवदुर्गा उत्सव मंडळ,मां शेरावाली नवदुर्गा उत्सव मंडळ, जय महाराष्ट्र नवदुर्गा उत्सव मंडळ,जय बजरंग नवदुर्गा उत्सव मंडळ,जय शिवराज नवदुर्गा उत्सव मंडळ,जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळ अशा एकूण १०  मंडळांनी दुपारी वाजत-गाजत आणि गुलाब पुष्पांची उधळण करीत विविध टाळ मृदंगाच्या गजरात देवींच्या गाण्यांवर ठेका धरत डोल- ताशे, वाद्यांच्या तालावर नृत्य करीत मिरवणूक काढली सर्व भाविकांनी देवींच्या मूर्त्यांचे विविध ठिकाणच्या जलाशयांमध्ये विसर्जन केले. अशा प्रकारे नऊ दिवस चाललेल्या या उत्सवाची भक्तिभावपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: