Uncategorized

वनोजा येथील साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालयात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

अकोला वन्यजीव विभाग व काटेपूर्णा अभयारण्य व साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालया वनोजा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाविद्यालया त वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभयारण्य चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पवार सर तसेच त्यांच्या कर्मचार्यांनी येथील विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षा घेतली. यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यानंतर या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम, व्दितीय व तृतीय याप्रमाणे बक्षीस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.यावेळी काटेपूर्णा अभयारण्या चे वनपरिक्षेत्र अधिकारी मा. श्री. पवार तसेच प्रा. घोंगटे व डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना वनांबद्दल मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालया तील विद्यार्थ्यांनी काटेपूर्णा अभयारण्या मध्ये जंगल भ्रमंतीचा मनसोक्त आनंद देखिल घेतला. यावेळी येथील कर्मचारी कुरवाडे यांनी विद्यार्थ्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी काटेपूर्णा अभयारण्या चे वनपरिक्षेत्र अधिकारी पवार, वनपाल, चाऊस तसेच वनरक्षक घुकसे, डुकरे, घुटके व महाविद्यालयातील प्रा. घोंगटे, पाथ्रीकर, डोंगरे, व इतर यांनी विशेष सहकार्य केले.

Share
bhavnatai gawali

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: