Uncategorized

दानापुर येथिल पत्रकार,माजी पं.स.सदस्य स्व.संजय वानखडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य भव्य रोगनिदान शिबीर

प्रतिनिधी-: निलेश बहाळ  आकोट

 दानापुर तालुका तेल्हारा जिल्हा अकोला येथिल पत्रकार व माजी पंचायत समिती सदस्य स्वर्गीय संजय वानखडे हे अतिशय लोकप्रिय व शान्त स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांना लहानपणापासुन सामजिक आणि राजकिय कार्यांची आवड होती. त्यांनी पत्रकारितेत आपल्या कार्याचा विशेष ठसा निर्माण केला होता. त्यांनी कमी वयात आपल्या सामजिक कार्याच्या जोरावर जनमानसांत आपली ओळख करून दिली. संजयवानखेडे हे कातेल कोलद येथिल गुलाब बाबा सौस्थन चे सदस्य होते. त्यांच्या कामाची आवड पाहुन मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने त्यांना दानापुर पंचायत समितीची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केला. यशाची पहिली पायरी चढत असतांनाच काळाने त्यांच्यावर झडप घातली व दिनांक १९/०९/२०१८  रोजी  हृदय विकाराने त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या आठवणींना उजाळा देत प्रेस क्लब दानापुर व मित्र मंडळ दानापुर यांच्या सयुक्त विध्यमाने भव्य निशूल्क रोगनीदाण शिबिर व दंत चिकित्सा शिबिर व औषधोपचार यांचे आयोजन दिनांक १९/०९/२०१९ रोजि सकाळी  ९ ते ५ यावेळेत करण्यात आले आहे. स्थळ  जिल्हा परिषद शाळा.दानापुर या सुवर्ण संधी चा लाभ घ्यावा असे आवाहन प्रेस क्लब दानापुर यानी केले आहे.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: