Uncategorized

मा.संजय भोसले शिवसेना गटनेते ,नगरसेवक म.न.पा.पुणे २०८ वडगांवशेरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने कोकणवासीय मेळावा संपन्न

प्रतिनिधी :- पंढरी गायकवाड पुणे

रविवार दि.१५/०९/२०१९ रोजी
डेक्कन कॉलेज हॉल ,येरवडा पुणे येथे सर्व कोकणवासीय मेळावा घेण्यात आला,या मेळाव्यात मोठ्या संख्येने हजारो कोकणवासीयांनि सहभाग घेतला होता, कोकणवासीय मेळावा मध्ये कोकणातील सांस्कृतिक कला दाखवण्यात आली यामध्ये , सिंधुदुर्ग कला निर्मित दशावतार आणि शक्तीतुरा जंगी सामना हे कोकणातील कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते मा.संजयजी भोसले यांनी सर्व कोकणवासीयांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कोकण बांधवांनी एकत्रित येऊन आपलं एक मत कोकणासाठी म्हणजेच मा.संजय भोसले यांच्यासाठी द्यावं असं सांगितलं, आणि कुठल्याही प्रकारची जात, धर्म,न पळता आपण एक कोकणवासीय आहोत हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दाखवून द्यायचं आहे, त्यासाठी सर्व कोकण बांधव एकत्र येणे गरजेचे आहे, असे बोलत शिवसेनेचे गटनेते मा.संजय भोसले यांना हजारो कोकण वासीयांनकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.यावेळी कोकणवासीय मेळाव्याचे प्रमुख उपस्थित मान्यवर- आमदार मा. राजनजी साळवी (राजपूर)
आमदार मा.उदयजी सावंत (रत्नागिरी)
आमदार मा.भास्कर जाधव (गुहागर रत्नागिरी)
आमदार मा.रविंद्रजी मिर्लेकर (खेड रत्नागिरी)
मा.बाळाभाई कदम (देवगड रत्नागिरी)
मा.गोपाळ शेलार (खारे पाटण,देवगड) आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन कविता ताई आंब्रे, स्मिता ताई चव्हाण, मंदाकिनी ताई खुळे, सुभद्रा ताई भगत, अमृता पठारे,अनिता परदेशीं, साधना ताई भगत,ज्योती रजपूत, संगीता पठारे, प्रण्या सावंत यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत मोरे, विभाग प्रमुख किशोर पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेना युवासेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले,जानू आखाडे, आबा निकम, चंद्रकांत साठे, सुरेश घाडगे, दिलिप शिंग ठाकूर, मदन पवार, अक्षय चव्हाण, आदर्श भोसले, प्रमोद जाधव, बबलु चव्हाण, शिवराज हलवी, संजय वाल्हेकर, राजू सावंत, राजेश वाल्हेकर, सोमनाथ खांदवे, संतोष आडेकर, मुहमध शेख, आत्माराम धुमाळ, संजय चांधारे, सागर माळकर, सुरेश आल्हाट, नितीन आल्हाट, प्रसाद जठार, हर्षल पहिलवान,पंढरी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. डेक्कन कॉलेज हॉल येरवडा मध्ये कोकणवासीय मेळावा मोठया उत्सवात पार पडला यावेळी हजारो कोकणवासीय मेळावमध्ये उपस्थित होते.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: