Uncategorized

मी कुणाचा पराभव करण्यासाठी नाही तर सर्व सामान्य माणसाच्या कल्याणासाठी राजकारणात आलो आहे. – आ.राजेश टोपे

केंद्रात आणि राज्यात सत्ता नसतांनाही विकास कामात खंड पडू दिला नाही.

प्रतिनिधि तनवीर बागवान प्रतिनिधि जालना

सुखापुरी /:- दि.१५.०९.२०१९
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात विरोधकांकडे विकासकामे करण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे त्यांच्यावर भावनिक आवाहने करीत फिरण्याची वेळ आज ओढवली आहे. माझं नातं थेट जनतेशी आहे, तुमच्या विकासाकरिता आयुष्याचा प्रत्येक क्षण मी दिला आहे आणि त्यांसाठीच माझे राजकारण असल्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी सुखापुरी,लखमापुरी,रेवलगाव,आदी गावात आज भेटी दरम्यान आयोजित कार्यक्रमात सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सतीश होंडे, पंचायत समिती सभापती सीताराम लहाने,जिल्हा परिषद सदस्य विष्णू गायकवाड,पंचायत समिती सदस्य रईस बागवान,बापूराव खटके,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागूजी मैद,सरपंच बाबूलाल बागवान,यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुक्यातील दुष्काळ घालविण्यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी अंबड तालुक्यातील गल्हाटी बारसवाडा, सुखापुरी तसेच डावरगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गोदावरीच्या काठावर बसलेल्या तसेच डावा कालवा जात असलेल्या गावातील शेतकऱ्यांना जसा आज दुष्काळ असतांना देखील फायदा मिळतो त्याच प्रमाणे शहागड येथुन लिफ्ट करून पाहिजे त्या ताकदीने शासनाकडून ही योजना मंजूर करून तीनही तलावात बारा महिने पाणी देऊन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देणार असल्याचे आ.टोपे यांनी सांगितले.

लोकनेते स्व.अंकुशराव टोपे यांच्यावर जनतेने खूप प्रेम केले, त्यांना शक्ती दिली म्हणून त्यांच्या प्रेमाची पावती म्हणून सत्तेत असतांना मंत्री पदाचा पुरेपूर उपयोग आपल्या भागाच्या विकासासाठी केला, आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात भरभरून विकासकामे केली आहेत. गावातील सर्व कामे हक्काने केले यापुढेही करील. विधानसभेच्या निवडणुकीत करून घनसावंगी मतदार संघात पाचव्यांदा नेतृत्व करण्यासाठी अधिक मताधिक्य देण्याचे आवाहन आ. राजेश टोपे यांनी केले.

यावर्षी दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकरी मोठया प्रमाणात अडचणीत सापडला आहे नाशिक भागात मोठा पाऊस झाल्याने जायकवाडी धरण १००% भरल्याने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार व मदत म्हणून कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना तसेच सागर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन दुष्काळी परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी उधारीवर उसबेणे व खते तसेच समर्थ बँकेकडून कर्जे उपलब्ध करुन देत असल्याचे ही आमदार राजेश टोपे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

शेतकऱ्यांनी व मतदार बांधवांनी विरोधकांच्या कसल्याही भूलथापांना बळी न पडता मतदान रुपी दान आपल्याच पारडयात टाकावे असे आवाहनही आ. राजेश टोपे यांनी यावेळी उपस्थितांना केले. या कार्यक्रमास बाबासाहेब बोंबले,लहुराव राखूंडे,प्रताप राखूंडे,राम फाटक,कल्याण शिंदे,सूर्यकांत मोताळे,लक्ष्मण शिंदे,नाथा सातभद्रे,महेंद्र गायकवाड, फकीर मोहम्मद बागवान,नसीर बागवान,कैलास राखूंडे,राजेश लहुटे, सर्जेराव शिंदे,उद्धव लंगोटे,वैजीनाथ फाटक,रमेश लहुटे,मोईन तांबोळी, श्रीकांत लुलेकर,कृष्णा राक्षे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: