Uncategorized

बीडच्या लेकीचं देशाच्या पंतप्रधानाकडुन कर्तृत्वाचं कौतुक जेव्हा होतं….

प्रतिनिधि:- तनवीर बागवान

बीड जिल्ह्याच्या राजकारणात मागच्या पाच-सहा वर्षात झालेला बदल हा जिल्हा विकासाच्या दृष्टीने आणि सामान्य जनतेला विकासाच्या प्रक्रियेत घेवुन जाण्याच्या पार्श्र्वभुमीवर किती महत्वाचा आहे? हे लोकांना दिसुन आलं. पालकमंत्री पंकजाताईचं नेतृत्व आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व इतकं मोठं आहे की हे नेतृत्व खऱ्या अर्थाने तळहाताच्या फोडाप्रमाणे लोकांनी जपलं तर भविष्यात बीड जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत उंच शिखरावर जावुन बसल्याशिवाय राहणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लाडक्या लेकीचं कौतुक करून बहन पंकजा केलेला उल्लेख खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील प्रत्येक माणसाची कॉलर टाईट करणारा होय. जिल्ह्यातील लोकांनी हेच नेतृत्व मान्य केलं. लोकसभा निवडणुकीत दाखवुन दिलं. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच्या सर्व आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली निवडुन येतील अशीच पिरस्थिती आहे. वर्तमान राजकिय परिस्थितीत काळाची गरज असुन रॉयलस्टोनवरचा गणपती त्यांना पावल्यासारखंच आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात संपुर्ण आमदार महायुतीचे निवडुन येतील.आता भविष्य सांगण्याची गरज नाही.औरंगाबादेत झालेला भव्यदिव्य राज्यस्तरीय मेळावा, त्याचं केलेलं नियोजन आणि कर्तृत्वाची छाप निश्चितच पंतप्रधानाचं मन जिंकणारी राहिली हे त्रिवार सत्य आहे.
पंकजाताई हे असं नेतृत्व आहे की त्यांना कुठलीही जबाबदारी द्या सक्षमपणे पार पाडतात. मंत्रीपदावर काम करताना जलसंधारण, ग्रामविकास या खात्याची ओळख त्यांनीच महाराष्ट्राला करून दिली. महिला बालकल्याण माध्यमातुन बचत गटाची महाचळवळ उभा करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी जोरदार मोहिम हाती घेतली. परवा औरंगाबादेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य कार्यक्रम झाला. ज्या कार्यक्रमाचं आणि महिलांच्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचं स्वत: पंतप्रधानानं जाहिर कौतुक केलं. देशाचे पंतप्रधान मेरी बहन पंकजा असा उल्लेख करतात. तेव्हा बीड जिल्ह्यातील प्रत्येक माणसाची कॉलर टाईट झाली. कारण या जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत असं कर्तृत्व गाजवणारं नेतृत्व गोपीनाथ मुंडेनंतर लेकीच्या माध्यमातुन पुढे आलं. पंतप्रधानासारखा व्यक्ती जेव्हा जिल्ह्याच्या लेकीचं कौतुक करतो.ही गोष्ट खऱ्या अर्थाने सहज नाही. मात्र अलीकडच्या काळात संघर्ष आणि कर्तृत्वावर पंकजाताईची वाढलेली उंची आणि त्यांनी घेतलेली झेप कौतुकाची वाटते. संपुर्ण महाराष्ट्रातून या मेळाव्यासाठी लाखावर महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम झाल्यानंतर बीड जिल्हावासियांना स्वाभिमान वाटला की आपलं नेतृत्व किती मोठं होत आहे? पाच वर्षे पंकजाताईंनी संपुर्ण जिल्ह्यातील जनतेच्या कल्याणासाठी समर्पित करून करत असलेली सेवा उल्लेखनीय आहे. जीवनात केलेला संघर्ष आणि साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन त्यांनी टाकलेली पावले खडतर होती. त्यावरही मात करत जणुकाही त्यांची पाच वर्षे बीड जिल्ह्यासाठी सुवर्णकाळाची राहिली असंच म्हणावं लागेल. त्यांनी बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास केला. रेल्वे, रस्ते आणि मुलभुत गरजा प्राधान्य देवुन न मार्गी लागणारे प्रश्न सोडवुन दाखवले. खरं तर हे नेतृत्व जेव्हा पुढं आलं तेव्हा लोकांना विकास काय असतो?हे माहिती झालं. आज बीड जिल्हा विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आघाडीवर आहे. अलीकडच्या काळात सामान्य जनतेमध्ये कमालीची लोक जागृती झाली असुन बीड जिल्ह्याच्या हितासाठी हेच नेतृत्व फायद्याचं आहे लक्षात आल्यानंतर पंकजाताईंना तळहाताच्या फोडाप्रमाणे लोक प्रेम करू लागले. त्यातुनच लोकसभा निवडणुकीत प्रितमताई मुंडे यांचा प्रचंड मताने विजय झाला. आता भविष्यात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यांची पाच वर्षाची यशस्वी कारकीर्द लोकांनी पाहिली. न भुतो न भविष्यति अशी कामगिरी करून दाखविली. त्यामुळे याच नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याचा जनतेचा विचार आहे. बीड जिल्ह्यात विधानसभेच्या सर्व जागा पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली निवडुनच येतील अशी परिस्थिती आहे. निवडणुक प्रक्रिया सुरू झाली असुन प्रत्येक मतदारसंघात इच्छुक उमेदवार जास्त आहेत. शेवटी बीड जिल्ह्यात कुणाला कुठं उमेदवारी द्यायची?याचा हुकमी एक्का म्हणुन पंकजाताई यांच्याकडेच बघितल्या जाते. एक गोष्ट खरी आहे की त्यांनी दिलेला उमेदवार मग तो कुणीही असो निवडुन देण्याची जणु काही मतदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. कारण अनेक वर्षे हेच नेतृत्व जर आपण सांभाळलं तर खऱ्या अर्थाने भविष्यात बीड जिल्ह्याचं भाग्य यापेक्षा अधिक कितीतरी पटीने उजळल्याशिवाय राहणार नाही अशी धारणा आता लोकांच्या मनात घर करून बसली.पंकजाताई या नेतृत्वाला पाठबळ देण्याची जणुकाही जिल्ह्यात स्पर्धाच लागली आहे. यंदाचा गणपती निश्चित त्यांना पावणार आणि जिल्ह्यात रॉयलस्टोनवरच्या गणपती आशिर्वादाने सर्वच्या सर्व जागा निवडुन येणार यात शंका नाही. कारण आपलं नेतृत्व किती ताकदवान आहे?हे जिल्हावासियांनी परवा औरंगाबादेत पाहिलं. त्यांच्या कर्तृत्वाची नोंद जेव्हा देशाचा पंतप्रधान घेतो आणि बहन म्हणत भावाच्या भुमिकेत पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. असा सुवर्णकाळ बीड जिल्ह्याच्या नशिबाला येणं हेच खऱ्या अर्थाने भाग्य आहे. या जिल्ह्याच्या राजकिय मातीत अनेक मातब्बर नेते होवुन गेले. मात्र एवढी राजकिय प्रचंड ताकद ज्या नेतृत्वाला मराठवाड्याच्या मातीत येवुन देशाचा पंतप्रधान पाठबळ देतो. याचा स्वाभिमान प्रत्येक जिल्हावासियांना वाटतो. महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत केवळ भाषणे व्हायची.प्रत्यक्ष सक्षमीकरणाची चळवळ बचत गटाच्या माध्यमातुन राबवणाऱ्या पंकजाताई या देशाच्या राजकिय नकाशावर एकमेव महिला नेतृत्व म्हणुन निश्चित पुढे आलेलं आहे. खरं तर औरंगाबादेत झालेला नेत्रदीपक सोहळा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी पाहिला. स्व.गोपीनाथराव मुंडे आज हयात असते तर लाडक्या लेकीचं कौतुक पाहताना त्यांनाही आश्रु आवरता आले नसते. मात्र स्वर्गातही लेकीचं कौतुक निश्चित पाहत असतील.अशा भावना कदाचित जाहिरपणे मांडणे चुकीचं वाटत नाही. कारण समन्यायाची भुमिका लोकप्रतिनिधीच्या अंगी असेल आणि अठरापगड जातीधर्माच्या जनकल्याणासाठी रात्रंदिवस नेतृत्व राबत असेल तर समाजातील तळागाळातला माणुस अशा लोकांवर प्रेम तर करतोच मात्र हे नेतृत्व साधं सुधं नसतं. ज्यांना परमेश्र्वरी ताकद असते.पंकजाताई ही एक फार मोठी शक्ती आहे. ज्यांनी बीड जिल्ह्याच्या विकासात होत्याचं नव्हतं करून सोडलं. लोकांना आकडे मोजता येत नाहीत एवढा प्रचंड निधी त्यांनी विकासकामासाठी आणला, कामं दर्जेदार करून दाखवले. म्हणुन आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे बीड जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभा राहताना दिसत आहे. आज राजकारणात काही गोष्टीचा त्रास त्यांना सहन करावा लागतो.मात्र्ा यावरही मात करून केवळ सकारात्मक भुमिका घेत विकासाचं राजकारण करण्यात स्वत:ला धन्य समजणारं हे महिला नेतृत्व ज्याच्या कर्तृत्वाची दखल देशाचे पंतप्रधान घेतात आणि मग आम्हा जिल्हावासियांची मान टाईट होते. स्वाभिमान दाटुन येतो. त्यांची वाढत असलेली लोकप्रियता यामागचं खरं रहस्य कदाचित प्रामाणिक कर्माधिष्ठीत जीवन असं म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही.

Share

मुख्य संपादक

GOPAL D.WADHE - 9970956934 Active न्युज for Active Person's महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: