क्राईममहाराष्ट्रमालेगाव

“जिओ जीने नही दे रहा” 

मोबाईल कंपनीने खोदलेल्या नालीमध्ये ट्रॅक्टर पलटी ट्रॅक्टर चे नुकसान

शिरपूर दि १९ जुलै (प्रतिनिधी)

शिरपूर शहरांमध्ये जिओ कंपनीने अनेक ठिकाणी विनापरवाना ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ठीक ठिकाणी विनापरवाना  भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्त्यावर  नाल्या   खोदल्या आहेत दिनांक 18 जुलै रोजी मुरुमाने भरलेला एक ट्रॅक्टर ची ट्रॉली नाली चुकवण्याच्या प्रयत्नांमध्ये पलटी झाली आहे. यामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे नुकसान झाले आहे

जिओ मोबाईल कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याचे काम शिरपूर शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये चालू आहे काही दिवसापूर्वी कंपनीचे खोदकाम चालू असताना सदर यंत्रणेला सदर काम करण्याचा परवाना बाबत नागरिकांनी विचारपूस  केली असता संबंधित यंत्रणेकडे कोणताही परवाना नसल्याचे नागरिकांच्या वतीने बोलले जात आहे

त्या वेळी नागरिकांनी ते खोदकाम त्वरित थांबवले होते कंपनीने खोदलेल्या नालीमध्ये दिनांक 18 जुलै रोजी एक मुरूमाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली नाली वाचवण्याचा प्रयत्न मध्ये चक्क पलटी झाली होती सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही मात्र  ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे नुकसान झालयाचे ट्रॅकटर मालकाने सांगितले

कम्पनीने  शहरामध्ये अनेक ठिकाणी विनापरवाना खोदकाम  केले आहे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे नाली खोदलेल्या ठिकाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा जोडण्या तुटल्यामुळे नुकसान झाले आहे .

“म्हणून जिओ जीने नही दे रहा”अशा प्रतिक्रिया जनमांनसाच्या मुखातून पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे..

Share
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: