क्राईम

कळमगव्हाण नजीक दुचाकीस्वारास अडवून लुटले

शिरपूर दि.२० (प्रतिनिधी)

Active न्युज टीम

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या ग्राम कळमगव्हाण नजीक नागपूर- औरंगाबाद महामार्गावर दिनांक १९ जुलै सायंकाळी ७.३० वाजताचे सुमारास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहिती नुसार जालना येथील एका औषध निर्मिती कंपनीचा सेल्समन असलेल्या आकाश दिलीप सारडा वय २५राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा हे वाशीम येथील औषध दुकानांवरील कंपनीच्या दिलेल्या मालाचे वसुलीचे काम आटोपून वाशिम वरून मेहकर कडे जात असताना त्यांचे वर पाळत ठेऊन असलेल्या ३ अनोळखी इसमांपैकी एकाने ग्राम कळमनजीक एका छोट्या मंदिराच्या बाजूला त्यांच्या मोटार सायकल समोर मोटारसायकल थांबवून लोणार जाणारा रस्ता विचारपूस करायला सुरुवात केली. त्याच वेळी एका मोटारसायकल वर दोन व्यक्तींनी येवून सारडा यांचे  मागून हात धरले व चाकूचा धाक धक्वत आरडाओरडा केल्यास जीवाने मारून टाकू असे धमकावले व गाडीची चावी व मोबाईलकाढून घेतले आणि सारडा यांच्या कडील पैशाची बग व मोबाईल घेऊन पोबारा केला.   सदर  ३ अनोळखी इसमांनी सारडा यांची सीबीझेड एम एच २८ एक्यू १०१४  मोटरसायकल अडवून त्यांच्याकडील चाळीस हजार रुपये रोख १४ धनादेश व २० हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. घटनेचे माहिती कळताच ठाणेदार वाठोरे यांनी घटनास्थळी भेट देऊनू चोरांचा शोध घेतला. सारडा यांच्या फिर्यादी वरून शिरपूर पोलीस स्टेशन येथे भांदवी ३९२,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी.एस.आय. राहुल काटकाडे हे करीत आहेत.

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: