महाराष्ट्र

सिल्लोड च्या महाराष्ट्र बँकेत शाखा व्यवस्थापकाची त्वरित नेमणूक करा आ.अब्दुल सत्तार

अन्यथा जनआंदोलनाचा इशारा;तहसीलदार यांना दिले निवेदन

सिल्लोड प्रतिनिधी, अजय बोराडे

(Active न्युज टीम)

 

बँक ऑफ महाराष्ट्र्र शाखा सिल्लोड चे शाखा व्यवस्थापक श्री. कळसकर हे जवळपास गेल्या महिन्याभरापासून बँकेत हजर नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्जासारखे प्रकरण तसेच खातेदारांच्या दररोजच्या व्यवहारासंबंधी अडी- अडचणीचे निवारण होत नाही. शाखा व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांची व खातेदारांची अडवणुक होत आहे . हे आम्ही कदापि सहन करणार नाही. येत्या 3 दिवसात  महाराष्ट्र बँकेत शाखा व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसिलदार सिल्लोड यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

सिल्लोड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील महत्वाच्या गावांचा समावेश आहे. शिवाय शहरातील जुनी बँक असल्याने अनेक खातेदार बँकेशी जोडले गेलेले आहेत. ग्रामीण भागात सध्या खरीप शेती पेरणीचे कामे सुरू आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना पीक कर्जाची नितांत आवश्यकता आहे.

या कामासाठी शेतकरी बँकेत येतात मात्र व्यवस्थापक नाही म्हणून येथील कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात.

याबाबत बँकेशी संपर्क साधला असता कार्यरत असलेले शाखा व्यवस्थापक यांची बदली झाली असल्याचे समजते. मात्र अद्याप सिल्लोड शाखेत व्यवस्थापक हजर न झाल्याने शेतकरी – खातेदारांची कामे खोळंबली आहेत. जर येथील व्यवस्थापकाची बदली झाली असेल तर त्यांच्या जागी दुसरे व्यवस्थापक रुजू का झाले नाहीत ?याची चौकशी करण्यात यावी. तसेच शेतकरी व खातेदारांची व्यवस्थापक नसल्या कारणाने जर अडवणुक पिळवणूक होत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. म्हणून येत्या 3 दिवसात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सिल्लोड मध्ये शाखा व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी सदरील निवेदनात दिला आहे.

 

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: