महाराष्ट्रलाईफस्टाइल

बळाचा वापर करून पोलिसांनी आदिवासी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिरडले

अंबुजा च्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - पप्पू देशमुख

Active न्युज टीम

जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील एक वर्षापासून अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू आहे.यानंतर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी अंबुजा विरूध्द भूसंपादन कराराचा भंग केल्यामुळे कारवाई   करण्याचा प्रस्ताव सहसचिव महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठविला आहे.परंतु आज पर्यंत या प्रस्तावाच्या अनुषंगाने सहसचिव महसूल विभाग यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच 1 महिन्यापूर्वी सर्व आदिवासी प्रकल्पग्रस्तांनी फसवणूक झाल्याची लेखी तक्रार करून अंबुजा व्यवस्थापनाच्या विरोधात ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये केलेली होती.मात्र दोन्ही प्रकरणामध्ये अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही .या दिरंगाईमुळे संतापलेल्या अंबुजाचे प्रकल्पग्रस्त आदिवासी व इतर शेतकऱ्यांनी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात दिनांक 24 जून रोजी अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. महसूल विभागाच्या सहसचिव यांचेशी चर्चा करून ठोस कारवाईचे लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका देशमुखवइतर प्रकल्पग्रस्तानी घेतली. दुपारी बारा वाजेपासून अंबुजा गेटवर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. तीन वाजेपर्यंत आंदोलनाच्या मागण्याबाबत कोरपण्याचे नायब तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी श्री कुणाल खेमनार यांच्याशी चर्चा केली व जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या सचिवांना स्मरण पत्र पाठवून आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.परंतु सदर प्रकरणात तीन महिन्यापासून कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे सह सचिवांशी चर्चा करून तातडीने ठोस कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका देशमुख व आंदोलनकर्त्या  शेतकऱ्यांनी घेतली.शांततेने सुरू असलेल्या या आदिवासी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनावर दुपारी साडेतीनच्या सुमारास कोरपना उपविभागाचे उपविभागीय अधिकारी यामावार,गडचांदूर  पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण व कोरपण्याचे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बळाचा वापर केला.पप्पू देशमुख यांचे पाय पकडून पोलिसांनी त्यांना फरफटत नेले. पोलिसांनी शांततेने आंदोलन करणार्‍या  महिला व पुरुषांना जबरदस्तीने फरफटत नेल्यामुळे त्यांना जखमा सुद्धा झाल्या.  बळजबरीने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलून गाडीमध्ये कोंबल्यामुळे अनेकांना इजा झाली. यानंतर सर्व आंदोलन कर्त्यांना गडचांदूर  पोलीस स्टेशन येथे अटक करून ठेवण्यात आले.   प्रकल्पग्रस्तांसोबत जन विकास च्या अनेक पदाधिकाऱ्यांवर सुध्दा पोलीसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केली  व गुन्हे दाखल केले.

 

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही.
Tags
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: