आरोग्यमहाराष्ट्रमालेगाव

शिरपूर आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार; जनतेचे आरोग्य वाऱ्यावर

लोकप्रतीनिधिना सुद्धा पडल्या जनतेच्या समस्यांचा विसर

शिरपूर दि.२५/०६/२०१९

Active न्युज

By – Gopal Wadhe

शासनाने शिरपूर जैन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेली इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पडून आहे. आरोग्य केंद्राचा तात्पुरता कारभार हा आरोग्य केंद्राच्या जुन्या खोल्यांमध्ये सुरु असून तो खरोखरच तात्पुरता सुरु आहे. कारण शिरपूर येथील आरोग्य अधिकारी हे नियमित अनुपस्थित असतात. याचीच प्रचीती दिनांक २५ जून रोजी आली.

दुधाळा येथील पोलीस पाटील सुरेश चीनकुजी काळे यांना रानडुकराने धडक दिल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तत्काळ शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता आरोग्य केंद्रात कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता इकडे तिकडे शोधाशोध केल्यावर प्रा.आ.केंद्रात दिलीप ठोसरे नामक औषधी निर्माता मिळाले. त्यांनी “दवाखान्यात कुणीही आरोग्य अधिकारी नाही”, “ त्यामुळे तुम्ही पेशंटला वाशीम येथे दवाखान्यात घेऊन जावे”. असे सांगून वाशीम रेफर केले. यावेळी पेशंटला कुठल्याही प्रकारचे प्राथमिक उपचार केले नाही हे विशेष. त्यानंतर ग्राम कोठा येथील राधिका गोपाल अवचार नामक महिलेला विंचवाने दंश केल्यामुळे प्राथमिक उपचाराकरिता तिच्या नातेवाईकांनी प्रा.आ.केंद्र शिरपूर येथे आणले असता त्या महिलेला सुद्द्धा उपचार मिळू शकले नाही. स्थानिक प्रतिनिधीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांना संपर्क केला असता त्यांनी डॉ.तिथेच कोठे असतील  मी फोन करून त्यांना दवाखान्यात पाठवतो. असे सांगितले.नंतर त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला.  त्यानंतर विंचू चावलेल्या त्या महिलेला सुद्द्धा उपस्थित दिलीप ठोसरे नामक औषधी निर्माता यांचे सांगण्यावरून वाशिम येथे रेफर करण्यात आले. अशा प्रकारे रोजच रुग्णांना व नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागते.

रुग्णाच्या व नागरिकांच्या होणाऱ्या हेळसांडीला थांबवण्याकरिता स्थानिक जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सदस्य असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेणे आवश्यक असतांना ते सुद्धा नागरिकांच्या समस्येकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत,  त्यांना फक्त मतदाना पुरतीच नागरिकांची आठवण येथे अशा प्रकारचा जनतेतून सूर उमटत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या भोंगळ कारभाराला वचक बसून रुग्णांची होणारी हेळसांड थांवाण्याकरिता शासन व प्रशासन स्तरावर तरी पुढाकार घेतला जाईल कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे, कारण प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवणारे तालुका आरोग्य अधिकारी हेच ‘तेरी भि चूप मेरी भी चूप’ या तत्वा नुसार त्यांची पाठराखण करीत आहेत.

शिरपूर प्रा.आ.केंद्रात आरोग्य अधिकारी आरोग्य केंद्रात उपस्थित नसतात हा प्रकार नित्याचाच झालेला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार आहे.कल्पना विजय अंभोरे पं.स.सदस्या शिरपूर

मी स्वतः प्रा.आरोग्य केंद्रात भेट दिली असता तेथे कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थिबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल करणार आहे. व तसा शेरा सुद्धा मी भेट पुस्तिकेमध्ये दिला आहेशिल्पा पंकज देशमुख पं.स.सदस्या शिरपूर

 

Share
महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: