कृषिवार्तामहाराष्ट्रमालेगाव

७५ वर्षे सेवानिवृत्त शिक्षकांनी फुलवली केसरी आंब्याची बाग

केसरी आंब्याने बगीच्या बहरला

मालेगाव ता २१ मे

Active न्युज टीम

जिद्द कष्ट अथक परिश्रम व विविध प्रयोगशील शेती करण्या चे सातत्य याचे फळ नेहमीच मिळते हे 75 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक मो उमदराज नूर मोहम्मद मालवी या सेवानिवृत्त शिक्षकांनी आपल्या शेतात केशर जातीच्या आंब्याचा फळबाग शेती मध्ये यशस्वी प्रयोग करून विदर्भ सारख्या उष्णकटिबंध भागात सुद्धा केसरी आंब्याची यशस्वी फळबाग शेती करून सिद्ध करून दाखवले त्यांच्या शेतातील केसरी आंब्याचे झाड लगबत आंब्याच्या फळांनी बहरून गेले यामधून त्यांना लाखो रुपये उत्पन्न होत असल्याने आपल्या भागात सुद्धा केसरी अंबा फळबागांची शेती यशस्वी होते हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले मालेगाव शहरातील प्रतिष्ठित जिल्हा परिषद मराठी शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक तथा प्रयोगशील शेतकरी उमदराज मालवी यांची शेलू फाटा येथे शहरा शहरालगतच गट नंबर 174 मध्ये शेती असून त्यांचे सुशिक्षित मुले व व ते स्वता नेहमीच आपल्या शेतीत निरनिराळे प्रयोग करत संत्रा मळा भाजीपाला टोमॅटो टरबूज काकडी फळबाग पिके घेत असतात याचाच एक भाग म्हणून केसरी आंब्याची फळबाग घेण्याबाबत त्यांनी सखोल अभ्यास करून अडीचशे-तीनशे केसरी आंब्याची लावगड आपल्या शेतामध्ये करून त्यामध्ये नियमित मशागत करून आवश्यक असे खत दिले यावर्षी एका झाडाला 30 ते 40 कोणत्या झाडाला 50 ते 60 असे मोठ्या आकाराचे केसरी आंब्याच्या फळांनी फळबाग बहरून गेली आहे उच्च दर्जाच्या केसरी जातीच्या सुवासिक फळाला स्थानिक बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे इतर ठिकाणच्या केसर आंबा पेक्षा स्थानिक ताजे केशरी आंबे आपलेच भेटत असल्याने ग्राहक त्यांच्याकडे मोठी मागणी करीत आहेत त्यामुळे त्यांनाच चांगला आर्थिक लाभ होऊन लाखो रुपये उत्पन्न मिळत आहे त्यांच्या फळबागेतील आंब्यांना आलेले आंबे पाण्यासाठी इतर शेतकरी निसर्गप्रेमी नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्या शेतात येत आहेत पारंपरिक शेती न करता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून व बाजार पेठेच्या मागणीनुसार विदर्भातील वाशीम जिल्ह्यात सुद्धा केसरी आंब्याची ची शेती ती यशस्वी होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले याचाच बोध आपल्या भागातील शेतकरी सुद्धा घेतील व आपली आर्थिक प्रगती उंचावतील असा आशावाद  वयोवृद्ध सेवानिवृत्ति शिक्षक  तथा प्रयोगशील शेतकरी उमदराज मालवी व त्यांच्या मुलांनी सांगितले  आहे

Share
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: