क्राईम

ग्रामपंचायत एक भ्रष्टाचार अनेक; नागरिक संभ्रमात

शिरपूर ग्रामपंचायत माजी सरपंच सचिवाने गैरप्रकार केल्याची आणखी एक तक्रार

आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.

तब्बल ३७ लाख ६८ हजार १०० रुपयाचा गैरप्रकार

शिरपूर दि. १३ (प्रतिनिधी)

शिरपूर ग्रामपंचायतच्या दोन माजी सरपंचानी व तत्कालीन सचिवांनी संगनमत करून तब्बल३७ लाख ६८ हजार १०० रुपयाचा गैरप्रकार केल्याची तक्रार शिरपूर येथील विध्यमान सरपंच सुनिता अंभोरे,गणेश अंभोरे व विजय अंभोरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे दिनांक १० मे २०१९ रोजी केली आहे.  मागील काही दिवसांपासून होत असलेल्या तक्रारी वरून शिरपुरच्या ग्रामपंचायतचे राजकारण ढवळून निघाले असून आता नागरिक मात्र वारंवार होणाऱ्या या तक्रारींवर चर्चेत रंगून गेले असून असल्या प्रकारामुळेच गावाचा विकास खुंटला असल्याचे आता बोलले जात आहे.

सदर तक्रारीत नमूद केले आहे कि दिनांक ३० ऑगष्ट २०१० ते २५ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत तत्कालीन सरपंच गणेश भालेराव व सचिव किसन सदाशिव काळबांडे यांनी संगनमत करून तब्बल ६लाख ५३हजार व दिनांक २६ नोव्हेंबर २०१२ ते ०२ सप्टेबर २०१५ या कालावधीत तत्कालीन सरपंच सुशांत जाधव व सचिव किसन सदाशिव काळबांडे यांनी संगनमत करून तब्बल ३१ लाख १५हजार १०० असे एकून वेळोवेळी तब्बल ३७ लाख ६८ हजार १०० रुपयाची रक्कमेचा १३ व्या वित्त आयोगाचा निधी धनादेशाद्वारे बेकायदेशीररित्या काढला आहे.सदर रक्कम बँकेतून काढतांना कोणत्याही कायद्याचे व नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे या रकमेचा गैरवापर झाल्याचे दिसत असून, वित्त आयोगातील रक्कम ५ हजारापेक्षा अधिक असल्यास ती रेखांकित धनादेशाद्वारे देण्याचे स्पष्ट आदेश असतांना कोणत्याही कारणाशिवायशासनाकडून विशेष परवानगी नसतांना सदर रक्कम काढलेली असून सदर बाब पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे  या प्रकारची चौकशी होऊन संबंधितांकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी व प्रस्तुत प्रकरणात उघड चौकशी केल्यास भ्रष्टाचाराची आणखी काही प्रकरणे उघडकीस येऊ शकतात अशी मागणी सदर निवेदनाद्वारे विध्यमान सरपंच सुनिता अंभोरे,गणेश अंभोरे व विजय अंभोरे यांनी केली आहे.

शिरपूर ग्रामपंचायत मध्ये वारंवार आजी व माजी पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे सर्वच पदाधिकारी एकाच माळेचे मनी आहेत अशी गावकऱ्यांची धारणा होत आहे. कुणालाहि गावाचे, गावकऱ्यांचे देणे घेणे नसून सर्वांना आपलेच खिसे भरण्याची घाई झालेली आहे असे या वारंवार होणाऱ्या आरोप व तक्रारींवरून दिसून येत आहे.

आरोप आणि प्रत्यारोप, चौकशी कारवाई या सर्वांमध्ये शिरपूरचे राजकारण ढवळून निघत आहे. याचा परिणाम विकास कामावर होत असून शिरपूर विकास आराखडा तयार झाला कि नाही हे सुद्धा गुलदस्त्यातच आहे. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१८ मध्ये दिलेल्या आदेशाचे अतिक्रमणाबाबत व विकास आराखड्याबाबत तंतोतंत पालन झाले कि नाही हे सुद्धा सर्व सामान्य जनतेला दिसून येत नाही. एकंदरीत शिरपूर ग्रामपंचायतची परिस्थिती बघता शिरपूर ग्रामपंचायत मध्ये झालेली अनियमितता लक्षात घेऊन ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नेमाने गरजेचे आहे. असे गावकऱ्यांना गरजेचे वाटत आहे.

प्रतिक्रिया –

  • १३ वा वित्त आयोगाचे ऑडिट झालेले आहे. त्यानंतरच विद्यमान सरपंचाला 14 वित्त आयोगाचे एक कोटी मिळाले आहे. विद्यमान सरपंचावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यामुळे खोटे आरोप करत आहेत. त्यांचेवर दिवाणी व फौजदारी दावा दाखल करणार आहे.- सुशांत जाधव माजी सरपंच.
  • …….
  • ग्रामपंचायतच्या खात्यातून झालेले सर्व व्यवहार हे पारदर्शक व नियमानुसार झालेले आहेत. तसेच ऑडिट सुद्धा झालेले आहे. विध्यमान सरपंचावर आम्ही दाखल केलेल्या तक्रारीनुसार भ्रष्टाचार सिद्ध होत असल्याने व पदधोक्यात आल्याने त्यांचे कडून हे बिनबुडाचे व खोटे आरोप केल्या जात आहेत.- गणेश भालेराव माजी सरपंच    

Share
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: