फोटोमहाराष्ट्रमालेगावलाईफस्टाइल

शिरपूर येथील स्मशानभूमिने घेतले आहे सुंदर बागेचे स्वरूप !!

प्रतिनिधी/शिरपूर :

active न्युज network

वृक्षारोपण करतांना दिलीप विश्वंभर
चर्चा करतांना डॉ.धूत व अशोकराव अंभोरे

            स्मशानभूमी म्हटले कि नक्कीच काही तरी अघटीत घडले असणार आणि,स्मशानभूमी म्हणजे एक भीतीदायक आणि सुनसान ठिकाण अशी सर्वत्र स्मशानभूमीची परिस्थिती बघावयास मिळते. परंतु शिरपूर जैन येथील स्मशानभूमी यास अपवाद ठरते येथील सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या सहयोग फौंडेशन व गावातील काही दानशूर नागरिकांच्या पुढाकाराने तसेच काही सामाजिक संस्था यांच्या अथक परिश्रमाने आई भवानी संस्थान जवळील स्मशानभूमी “मोक्षधाम” आज नंदनवन झाली आहे.

मोक्षधाम मध्ये जाण्याचा प्रशस्त रस्ता

सदर स्मशानभूमी हि जाणार्‍या-येणार्‍या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. येथे शासनाचा एक पैसा सुद्धा न घेता लोक वर्गणीतून व अनेक सामाजिक संस्था, ग्राम पंचायत,सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांनी स्मशानभूमीस बहुमूल्य योगदान दिले आहे. आज येथे सिमेंटचे रस्ते, पाण्याची व्यवस्था, सुसज्ज सभामंडप,बसण्यासाठी ६० बेंच, स्मशानभूमीच्या चारी बाजूंनी कंपाऊंड केलेले आहे .दरवर्षी येथे वृक्षारोपण केले जाते ,फक्त  वृक्षारोपणाच नव्हे तर वृक्ष जतन करण्याची पूर्ण जबाबदारी काही नागरिकांनी घेतलेली आहे .आजमितीला येथे शेकडो वृक्ष हिरवीगार दिसत आहेत. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे  लक्ष वेधल्याशिवाय राहणार  नाही, असे म्हणता येईल.

स्मशानभूमी मध्ये बसलेले नागरिक
स्मशानभूमी मध्ये बसलेले पुरुषोत्तम मुंदडा व नागरिक
स्मशानभूमी मध्ये बसलेले नागरिक
फरशी बसविण्याचे काम सुरु असतांना

आज सर्वच कामे शासनाकडूनच केली पाहिजेत अशी नागरिकांची अपेक्षा असते, यास फाटा देऊन येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप विश्वंभर यांच्या पुढाकाराने आज ही स्मशानभूमी निसर्गरम्य स्थळ किंवा एखाद्या बागेसारखी दिसत आहे. वृद्ध नागरिकांना येथे निवांतपणे बसण्याची व्यवस्था झालेली आहे. येथे नेहमीच निवांतपणे नागरिक येथे असलेल्या बेंच्यावर बसलेल दिसतात.

नयनरम्य फुलांनी फुललेली वेल

यासाठी  अनेक नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामध्ये सेवा निवृत्त न्यायाधीश दत्तात्रय राजे १० बेंच, श्वेतांबर जैन संस्थान  २० बेंच, डॉ. शाम गाभणे ५ बेंच, अनिल उल्हामाले २ बेंच, सलिम गवळी ३ बेंच, संत अमरदास अर्बन क्रेडीट सोसायटी मर्या.रिसोड संस्थापक अध्यक्ष श्री उत्तमचंदजी बगडे  १० बेंच, तसेच शिरपूर येथील सेवा निवृत्त न्यायाधीश दत्तात्रय राजे यांच्याकडून या स्मशानभूमी विकास कामा करिता वार्षिक दहा हजाराची देणगी मिळते, स्मशान भूमीमध्ये रवी कोंढे यांच्या सौजन्याने बनवलेल्या हॉल मध्ये पुरुषोत्तम मुंदडा यांच्या जन्म दिवसा निमित्त तसेच स्व.बंडू उर्फ सुरेश जगन्नाथ विश्वंभर यांच्या स्मृत्ती प्रित्यर्थ फरशी बसविण्यात आली आहे.

विकास कामाची पाहणीकरतांना विजय अंभोरे

क्रांती पेनेलचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव अंभोरे यांनी तेथील झाडांना पाईप लाईन द्वारे पाण्याची तसेच लाईटिंगची व्यवस्था करून दिली आहे. संजय कान्हेड यांनी ठिबक सिंचन सेट दिले आहे, येथील कासार समाजाच्या वतीने येथे कमान बसविल्या जाणार आहे, तसेच येथे अंतिम संस्कार कार्यक्रमास आलेल्या लोकांकडून झोळी फिरवून अनोख्या पद्धतीने वर्गणी जमा केल्या जाते. आशा अनेक सामाजिक कार्यातून ही स्मशानभूमी निसर्गरम्यस्थळ म्हणून उदयास आली आहे. शासनाचा एक पैसा सुद्धा न घेता या जनहिताच्या कार्याची मोट बांधण्यास सहयोग फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व डॉ.माणिक धूत व त्यांच्या सहकाऱ्यांचा,मित्रमंडळीचा सिंहाचा वाटा आहे. ह्या स्मशानभूमीचा एवढा काया पालट झाला आहे कि,येथे मागील ३ वर्षा पासून दिलीप विश्वंभर हे आपला जन्म दिवस साजरा करीत आहेत व त्यामधून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. लोकांच्या येथील स्मशानभूमी म्हणजे समाजाने एक आदर्श घेण्याचे उदाहरण आहे.

विश्वंभर यांचा वाढदिवस साजरा करतांना जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे,अरविंद गाभणे सर व इतर मान्यवर

||==*****==++$$~@!@~$$++==*****==||

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ Active न्युज” ;

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

मुख्य संपादक – गोपाल वाढे –

Active न्युज for Active Person’s News that works

For more updates, join us….

Whatsup – 9970956934

Follow this link to join my

WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KLBFJcfhvQNKatUoEatJYC

Face book —  https://www.facebook.com/activenews.in/

Twitter — https://twitter.com/activenews13

Website — http://www.activenews.in/

YouTube — https://www.youtube.com/channel/UCu3t0HX1BJncc59JfjhLCSw

Play Store App — https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

स्मशानभूमी मधील प्रशस्त हॉल

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही…

Share
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close
%d bloggers like this: