लाईफस्टाइलवाशिम

पोलिस प्रशासनाच्या अभुतपूर्व सर्तकतेमुळे व कर्तव्यदक्षतेमुळे ‘माता का जगराता’ मधील अनर्थ टळला

active न्युज network

प्रतिनिधी / वाशीम
वत्सगुल्म सार्वजनिक जगदंबा उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या ‘माता का जगराता ‘ या कार्यक्रमात सुप्रसिध्द भक्तीगीत गायिका शहनाज अख्तरने सर्वांची मने जिंकली, अनेकांची पावले थिरकायला लावली. मात्र, कार्यक्रमाच्या शेवटच्या चरणात अपप्रवृत्ती ज्यांचा स्थायी भाव आहे, अशा मुठभर तरुणांनी घातलेल्या गोंधळाने कार्यक्रमास गालबोट लागले. कार्यक्रमास जवळपास पाच हजाराच्यावर महिला, बालके तर त्याहून अधिक संख्येत पुरुषमंडळी होती. महिन्याभरापुर्वीच आपल्या अतिरिक्त महिला जि. पो. अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतलेल्या तरूण तडफदार महिला पोलीस अधिकारी नंदा पराजे आणि वाशीम शहर पोलीस ठाणेदार म्हणून अवघ्या अडीचतीन महिन्यापुर्वी ठाणेदारपदी रुजू झालेले पोलीस निरिक्षक हरिष गवळी या दोन पोलीस अधिकार्‍यांच्या चोख कर्त्यव्य बंदोबस्तामुळे तव्दतच विचलीत झालेल्या जनसमुदायाला अचूकरित्या नियंत्रण करण्यामुळे कार्यक्रमस्थळी होणारा भयंकर मोठा अनर्थ टळला. अन्यथा चेंगराचेंगरीतच अमृतसरमध्ये रेल्वे ट्रकवर रावण दहनाच्या वेळी रेल्वेने कटून झालेल्या १६१ जणांच्या जीवहाणी पेक्षाही मोठी हानी वाशीममध्ये झाली असती. म्हणूनच अतिरिक्त जि. पो. अधिक्षक नंदा पराजे आणि वाशीमचे ठाणेदार हरिष गवळी यांच्यासह शहर पो. स्टे. आणि ग्रामीण पो. स्टे. चे सर्वच अधिकारी व कर्मचारी वाशीमकर जनतेच्या अभिनंदनास पात्र ठरले आहेत. निश्‍चितपणे या सर्वांनी त्यांचा सत्कार घेण्यायोग्य कामगिरी बजावली आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी दोन गटातील तंट्याचे पर्यावसान हिंसक स्वरुपाच्या चकमकीत झाले. या प्रकरणी फिर्यादी सतिष उर्फ गल्ला वानखेडे याच्यावर जावेद बेनिवाले आणि कासम बेनिवाले यांनी चाकुहल्ला केल्याची फिर्याद सतिष उर्फ गल्ला वानखेडे पोलीसात दाखल केली आहे. पोलिसांनी अपराध क्र. ४४२/१८ अन्वये एफआयआर दाखल केला असून आरोपी जावेद बेनिवाले व कासम बेनिवाले यांच्यावर भादंवि ३२४, ३४ अन्वये गुन्हे नोंदविले आहेत. वृत्तलिहिपावेतो आरोपींना अटक करण्यात आल्याचे वृत्त नव्हते.
याप्रकरणी प्रथम कुणी कुणावर हल्ला चढविला याबाबत सीसीटीव्ही आणि कार्यक्रमस्थळी असलेल्या मोठय़ा कॅमेरातील चित्रीकरण पाहल्यानंतर वस्तुस्थिती नेमकी काय होती हे स्पष्ट होईल, असे पोलीस स्टेशन सुत्रांनी सांगितले.
भक्तीगीत व तत्सम गाणे याबाबत सध्या आघाडीवर असलेल्या गायिका शहनाज अख्तर यांच्या ”मुझे चढ गाय भगवा रंग ” या गीतामुळे भगव्या विचार सरणीच्या तरुणाईला वेड लावणारी ही गायिका मुस्लिम असल्यामुळे तिच्या कार्यक्रमाचे सर्वानाच अप्रुप होते. सहाजिकच पुरुषांपेक्षा महिला व बालकांची प्रचंड गर्दी होती. पोलीस सुत्रानुसार कार्यक्रमाच्या शेवटी दोन गटात काही जुन्या कारणांमुळे झालेल्या वादाचे पर्यावसन भांडणात झाले. एक एवढा अपवाद वगळता कार्यक्रम नितांत सुंदर झाला. मात्र, कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही गटातील वात, पित्त, विकार उफाळून आल्यामुळे कार्यकमास गालबोट लागले. पोलीसांनी सर्तकता दाखविली नसती, गोंधळलेल्या जमावाला नियंत्रीत केले नसते आणि कार्यक्रम रावण दहन करण्याच्या खुल्या मैदानात असता तर वाशीमकरांची दिवाळी शोकमग्न झाली असती. या घटनेपासून उत्साहाचे भरते आलेल्या कार्यक्रम आयोजकांनी फार मोठा धडा घेण्याची गरज आहे. घटनेचे विश्लेषण करू गेल्यास सर्व सामान्य जनतेला दुधात लिंबू पिळणार्‍यांपासून काही एक देणे घेणे नाही. येथील जातीय सलोखा, बंधूभाव यावर तिळमात्र परिणाम करणारी ही घटना नसून दोन जणांमधील वादांमधील ही परिणीती होती. ही एकूणच या घटनेमागची वस्तुनिष्ठता आहे. याच कारणांमुळे जनतेने कुठल्याही अफवांना, अपप्रचाराला बळी न पडता आपसातील बंधूभाव आणि गावगाड्यातील स्नेह, एकोपा व व्यवहार अबाधित राखावे असे आवाहन जि. पो. अधीक्षक मोक्षदा पाटील, प्रभारी अतिरिक्त जि. पो. अधिक्षक नंदा पराजे आणि ठाणेदार हरिष गवळी यांनी केले आहे.

——————————————

‘ब्रेकिंग न्युज’ व ‘ताज्या घडामोडी’ पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.किंवा आपल्या active news या फेसबुक पेजला like करा. you tube चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 9970956934 व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.किंवा  active news app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

जाहिरात व बातमीसाठी आजच सम्पर्क करा.

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे- 9970956934

Active न्युज for Active Person’s

Share
bhavnatai gawali

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
ह्या वेबसाईट वरील सर्व बातम्या लेख आणि फोटो चे हक्क गोपाल वाढे यांचेकडे असून पूर्वपरवाणगी शिवाय कॉपी करू नये.
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
%d bloggers like this: