क्राईम

शिरपूर ग्रा.पं.चे ग्राम सेवक अरुण इंगळे निलंबित

कामात प्रचंड अनियमितता व निधीचा अपहर केल्याचे कारण

प्रतिनिधी : शिरपूर जैन

शिरपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अरुण इंगळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशाने आज दिनांक 26 रोजी निलंबित करण्यात आले कर्तव्यात कसूर करणे शासन निर्णयानुसार ई निविदा प्रक्रिया राबवणे आणि शासकीय निधी मध्ये  अनियमितता  करणे असे आरोप ग्रामसेवक इंगळे यांच्यावर ठेवण्यात आले आहे.

शिरपूर येथे कार्यरत असतांना सुरुवातीपासूनच इंगळे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. त्याच्या विरोधात अनेक वेळा तक्रार अर्ज, संबंधित कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्यात आला. इंगळे शिरपूर येथे कार्यालयात अनेक दिवस अनुपस्थित राहायचे.त्यामुळे सामान्य जनतेचे कामे वेळेवर न होण्यामुळे अनेकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागले. तसेच इंगळे यांनी कर्तव्यात कसूर करीत कामाच्या निविदा ह्या शासन निर्णयानुसार ई निविदा प्रक्रिया न राबवविता कमी दिवस ऑनलाईन ठेवल्या तसेच सर्व नियमांना तिलांजली देत शासकीय निधी मध्ये  अनियमितता करीत सर्वसामान्यांच्या निधीचा अपहार केला. असे आरोप ग्रामसेवक इंगळे यांच्यावर ठेवण्यात आले आहे.

 

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close