क्राईममालेगाव

शिरपूर येथील वॉटर फिल्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

मागील चार महिन्यापासून पोलिसांना देत होते गुंगारा

दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड

Active न्युज

दिनांक  ०६ फेब्रुवारी रोजी अनेक विद्यालयासमोर असलेल्या वाटर फिल्टर मध्ये घुसून तीन भावंडांना जबर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली होती. तर दोन मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर येथील संतोष प्रकाश गाभणे, विलास प्रकाश गाभणे, जगदीश प्रकाश गाभणे या ३ भावंडाना लोखंडी पाइप ने मारहाण करून गंभीर जखमी केले होते.

याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी भादवि कलम 307, 324, 452, 143, 147, 148, 149, 109, 114 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी चंद्रप्रकाश उर्फ प्रकाश निवृत्ती अंभोरे वय 34 राहणार शिरपूर व राजेश उर्फ भैय्या सखाराम बांडे वय 28 राहणार अमडापुर ह.मु. शिरपूर हे मागील महिन्यापासून पोलिसांना चकमा देत फरार होते. पोलीस त्यांच्या शोधात होते. काल दिनांक ६ जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी डॉ.पवन बनसोड सहाय्यक पोलिस अधिक्षक उपविभाग वाशीम व त्यांचे तपास पथक यांनी वाशिम रेल्वे स्टेशन वरून रेल्वे ने बाहेर गावी जाण्याच्या बेतात असलेल्या प्रकाश अंभोरे व राजेश बांडे यांना रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरून बसलेले डॉ. पवन बनसोड व त्यांच्या टीमने अटक करून पुढील तपास कमी शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. असून शिरपूर पोलिसांनी त्यांना वि. न्या.हजार केले असता दिनांक ०९ जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आली.असून पुढील तपास प्रभारी ठाणेदार राहुल गुहे करीत आहेत.

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
Show More
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close