क्राईम

विहीर खचून दोघांचा मूत्यू तर एकाला मिळाले जीवदान

कारंजा तालुक्यातील म्हसला येथील घटना

फुलचंद भगत :

Active न्युज

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील म्हसला शेत शिवारातील विहीर खचून दोघांचा करून अंत झाला तर एकास जीवदान मिळाल्याची घटना बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडली .

मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार म्हसला येथील सुधाकर थोरात यांच्या शेता मध्ये वीहीचे बांधकाम पूर्ण झाल्या नंतर विहिरीच्या बाजूला मुरूम व माती जेसीबी च्या साह्याने टाकत असतांना अचानक विहीर खचून विहिरी जवळ उभे असलेले रवी तलवारे राहणार बेलखेळ कामठा व पुंडलिक धाये राहणार म्हसला यांचा मलब्या खाली दबून मूत्यू झाला .तर थोरात यांना वाचविण्यात यश आले .घटनेची माहीती मिळताच धनज पोलिस स्टेशन चे ठाणेदार शिशिर मानकर हे आपल्या कर्मचाऱ्या सह घटना स्थळी हजर होऊन घटनेची माहीती घेतली विहीर ही तीस ते चाळीस फूट खोल असल्यामुळे विहिरी मध्ये मलब्या खाली दबलेल्या दोघांना काढण्या करीता नागरिकांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न सुरू होते. घटना स्थळाला कारंज्या चे तहसीलदार रंजीत भोसले यांनी भेट दिली .घटनेचा पंचनामा कामरगांव पोलिस चौकिचे पोलिस उपनिरीक्षक राजेश पंडित यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास जमादार रवी राजगुरे हरीष दंदे करीत आहे.

Tags
Show More
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणू घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा. मुख्य संपादक - गोपाल वाढे –9970956934 Active न्युज for Active Person's News that works महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close