क्राईम

वाशिम चा लाचखोर तांत्रिक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

वाशिम- शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी ५०००रुपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा रेशीम कार्यालयाचा तांत्रिक अधिकारी संदीप समाधान मोरे (वय वर्ष 33) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली.

तक्रारदार यांनी व त्यांचे गावातील इतर तीन शेतक-यांनी त्यांचे शेतामध्ये जिल्हा रेशिम कार्यालया मार्फत मनरेगा अंतर्गत तुती लागवड केलेली आहे. याेजनेअंतर्गत तुती लागवड,शेड बांधण्याकरीता व मजूरीसाठी शासनाकडून तीन लाख रूपये पर्यंत अनुदान मिळते, त्याकरीता तक्रारदार व इतर तीन शेतक-यांनी शेड पूर्ण बांधून शेडचे बील संपूर्ण कागदपत्रासह कार्यालयात सादर केले असता आरोपी इलोसे संदिप मोरे यांनी तक्रारदारासह इतर तीन जणांचे बिल काढण्याकरीता फाईल पुढे पाठविण्यासाठी प्रत्येकी दोन – दोन हजार असे ८००० रूपये लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून लाचखोर संदीप मोरे यांना २६ एप्रिलला पहिला हप्ता ५००० रुपये लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. सदर कार्यवाही श्रीकांत धिवरे पोलीस अधिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परीक्षेत्र अमरावती, पंजाबराव डोंगरदीवे अपर पोलिस अधिक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती राहुल गांगुर्डे,पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे, पोहेकॉ.नितीन टवलारकर,दिलीप बेलोकार, नापोशी सुनिल मुंदे,विनोद अवगळे आदींच्या पथकाने केली

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close