क्राईमताज्या बातम्यादेशविदेश

बाबा रामपाल दोषी ; देशद्रोह आणि हत्या प्रकरण.

न्युज, network /हिस्सार :देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरू रामपाल याला हिस्सार कोर्टाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. आता त्याला काय शिक्षा सुनावली जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान हिस्सार कोर्टाच्या तीन किलोमीटर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. सुनावणीच्या दरम्यान २0 हजार सर्मथक कोर्ट परिसर, तुरूंग, टाऊन पार्क आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. सर्मथकांनी हिसंक वळण घेऊ नये त्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना केली.
                                 असे आहे प्रकरण
२00६ मध्ये रामपाल यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ या धार्मिक पुस्तकातील काही भागावर आक्षेप घेतला होता. यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला होता. यावेळी लोकांनी रोहतकमधील रामपाल यांचे आर्शम बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रामपाल यांच्या सर्मथकांनी त्यांच्यावर गोळीबारही केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर १६0 जण जखमी झाले होते. यानंतर न्यायालयाने रामपाल यांना ४३ वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही रामपाल न्यायालयात हजेरी लावत नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस रामपाल यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या रोहतक येथील आर्शमात पोहोचले होते. मात्र, याठिकाणी रामपाल यांचे १५ हजार सर्मथक आधीच हजर होते. यावेळी त्यांनी पोलिसांवरच दगडफेक, गोळीबार, पेट्रोल बॉम्ब आणि अँसिड बॉम्बचा हल्ला चढवला होता.

                                कोण हा रामपाल?
१९५१मध्ये सोनपत येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला रामपाल हरयाणा सरकारच्या पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता होता. सेवेतील कुचराईवरून त्याला काढले गेल्याचे बोलले जाते, १८ वर्षांच्या सेवेनंतर ते स्वत:हून नवृत्त झाले, असे त्यांचे सर्मथक सांगतात. सेवेत असतानाच १९९९मध्ये त्याने आपला पहिला आर्शम काढला. नंतर आपण संत कबिरांचा अवतार आहोत, असे त्याने जाहीर केले व हरयाणात अनेक भागांत आर्शम काढले. २00६ पासून देशद्रोह आणि हत्येचा खटला सुरू झाला. त्यानंतर चर्चेत आला. हत्येप्रकरणी २0१४ मध्ये स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपालला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

********************************************************************************

*ब्रेकिंग व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या न्यूज पोर्टल ला भेट द्या*

बातम्या व जाहिराती संपर्क करा.

➡ मुख्य संपादक – गोपाल वाढे ९९७०९५६९३४

(active न्युज, network )

आपले ऑनलाइन न्यूज पोर्टल  activenews.in

Show More

Related Articles

27 Comments

  1. A fascinating dіscussion is definiteⅼy worth comment.
    I think that yօu need to write more on this tⲟⲣic, it might
    not be a taboo matter but typicalⅼy people do not discuss such issues.
    To the next! Мany thаnks!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close