महाराष्ट्र

दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला मंजुरी देऊ नका; निवेदना द्वारे मागणी

active न्युज network

प्रतिनिधि/हिंगोली :

औंढा नागनाथ नगरपंचायत हद्दीत नवीन देशी दारूचे दुकान, बियरबार व वाईनशॉपला शासनाने मंजुरी देऊ नये, या मागणीचे निवेदन २० आक्टोबर रोजी जिल्हाधिकायांना देण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे धार्मिक ठिकाण असल्याने देशभरातून भाविक औंढा येथे येतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने सर्व धर्मातील समाजबांधव एकत्र जमतात. त्यामुळे नवीन दारू दुकाने स्थलांतरित करण्यास परवाना देऊ नये, शिवाय स्थानिक प्रशासनास सुद्धा तसे निर्देशित करून नवीन बार व शॉपी मंजूर करू नयेत, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्ककडे करण्यात आली आहे. औंढा नागनाथ येथे सर्वधर्मीय लोक एकत्रित राहतात. त्यामुळे निवेदनाद्वारे केलेल्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष घालावे. तसेच यापुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबधित अधिकायांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शेख निहाल तसेच मोठ्या संख्येने नागरिक निवेदन देण्यासाठी जिल्हा कचेरीवर जमले होते.

********************************************************************************

ब्रेकिंग न्युज व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या activenews.in या पोर्टल ला भेट द्या

किंवा

आपल्या मोबाईल मद्ये play store वरुन app डाउनलोड  करा aap लिंक पुढे दिली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=com.activenews.smtech

➡मुख्य संपादक, गोपाल वाढे

Active न्युज for Active Person’s

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close