आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.
मालेगावलाईफस्टाइल

गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बाब..

असे झाल्यास एजन्सी परत करेल पूर्ण चार्ज, हक्काचे पैसे परत घ्यायला विसरू नका

Story Highlights

  • इथेही नोंदवू शकता तक्रार…इण्डेन गॅस - http://webapp.indianoil.co.in/paribhavam/
  •  पेट्रोलियम मंत्रालय होम डिलिव्हरी न देता त्याचा चार्ज वसूल करणाऱ्या गॅस एजन्सींवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. गॅस एजन्सीज तुमच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचवण्याचा चार्ज वसूल करतात. सिलिंडरच्या किमतीबरोबर हा चार्ज वसूल केला जातो. जर तुम्ही स्वतः गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून सिलिंडर आणत असाल तर एजन्सी तुमच्याकडून डिलिव्हरी चार्ज वसूल करू शकत नाही. नियमानुसार ग्राहकांनी डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन स्वतः सिलिंडर घेत असतील तर त्यांच्याकडून डिलिव्हरी चार्ज वसूल करता येऊ शकत नाही. त्याशिवाय गॅस कनेक्शन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मोफत इंश्योरन्सचा अधिकारही मिळाला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, लोकांनी डिलिव्हरी चार्जचा हक्काचे पैसे परत घेणे विसरता कामा नये. या प्रक्रियेची माहिती आम्ही देत आहोत.

असे परत घेऊ शकता पैसे

– पेट्रोलियम मंत्रालयाच्या मते, गॅस सिलिंडरच्या किमतीत होम डिलिव्हरी चार्जचे 20 रुपयेदेखिल असतात. पण तुम्ही गॅस एजन्सी किंवा गोडाऊनमधून स्वतः जाऊन सिलिंडर आणले तर ते 20 रुपये परत मिळू शकतात.

– एखाद्या एजन्सीने पैसे परत केले नाही तर त्याची तक्रार करता येते. तसे झाल्यास संबंधित एजन्सीला दंड होऊ शकतो.

– 3 पेक्षा जास्त तक्रारी मिळाल्यास परवाना होऊ शकतो रद्द.

प्रत्येक ग्राहकाचा 50 लाखांचा इंश्युरन्स

प्रत्येक एलपीजी ग्राहकाचा 50 लाखांपर्यंतचा विमा असतो. त्यासाठी ग्राहकाला अतिरिक्त हप्ता भरावा लागत नाही. एलपीजी सिलिंडरमध्ये तुमच्या घरात अपघात झाला तर तुम्हाला 40 लाखांपर्यंतचा इंश्युरन्स क्लेम करता येतो. सिलिंडर ब्लास्टमुळे मृत्यू झाल्यास 50 लाखांपर्यंतचा क्लेम करता येतो. जखमी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.

ऑटोमॅटिक होतो इंश्युरन्स

– नवे कनेक्शन घेतल्यास विमा आपोआप मिळतो. कनेक्शन घेताना दिल्या जाणाऱ्या पैशात इंश्युरन्सच्या रकमेचा समावेशही असतो.

– पेट्रोलियम कंपन्यांना याचा इंश्युरन्स करावा लागतो, त्या माध्यमातून अपघात झाला तर कंपनी पीडित व्यक्तीला पैसे देते.

– काही अपघात झाला असेल तर त्याबाबत लगेचच पोलिस आणि इंश्युरन्स कंपनीला माहिती दिली जाणे गरजेचे आहे. तरच याचा फायदा होऊ शकतो.

गॅस सिलिंडर मोबाईलवरून बुकिंग करताना आता सबसिडी नाकारण्यासाठी ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ असे नवीन दोन सुधारित पर्याय समाविष्ट करण्यात आले आहेत. ते निवडताना चुकून आकड्यांची अदलाबदल झाल्यास सबसिडी बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. ही तांत्रिक चूक झाल्यास त्याचे पुढील निराकरण कसे करायचे, याचे उत्तर गॅस वितरकांकडेही नाही. सध्या ही योजना इंडेन कंपनीकडून सुरू झाली असली तरी ‘एचपीसी’ व ‘बीपीसी’ कंपन्यांकडेही ती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

गॅस कंपनीच्या दिलेल्या क्रमांकावर ग्राहकांनी आपल्या विक्रेत्याकडे जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे त्याद्वारे कॉल केल्यास गॅस बुकिंग होतो. ग्राहकांना घरबसल्या ही सुविधा कंपन्यांनी जरी उपलब्ध करून दिली असली तरी ती सध्या मोठी डोकेदुखी झाल्याचे दिसते. मोबाईलवरून गॅस बुक करताना गॅसची सबसिडी नको असेल तर ‘शून्य’ व पाहिजे असल्यास ‘एक’ बटण दाबण्याची सूचना येते. त्यामध्ये चुकून ‘शून्य’ बटण दाबल्यास सर्वसामान्यांना मिळणारी सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका इंडेन गॅस कंपनीच्या ग्राहकांना बसला आहे. सबसिडी बुडण्याच्या भीतीने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. सद्य:स्थितीला विशेषत: ग्रामीण भागात या अडचणी जाणवत आहेत. ग्रामीण भागातील सर्वच ग्राहक सुशिक्षित असतील असेही नाही. त्यामुळे चुकून ‘शून्य’ बटण दाबले गेल्याने ग्राहकांना नाहक मन:स्ताप होत आहे.

याबाबत पुढे काय करायची यासंबंधीची विचारणा करायला गेल्यावर गॅस विक्रेत्यांजवळही त्याचे उत्तर नाही. कारण ही तांत्रिक सुधारणा थेट कंपनीकडूनच झाली असल्याने विक्रेत्यांनाही त्यात काही हस्तक्षेप करता येत नाही.

मोबाईलने बुकिंग करताना घ्या काळजी

एखादी नवीन योजना आणताना कंपनीने सुरुवातीला आपल्या गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यानंतर ग्राहकांनाही या संदर्भात सविस्तर माहिती दिली पाहिजे तसेच या योजना पूर्णपणे कार्यान्वित होऊन ग्राहकांमध्ये रूळत नाहीत तोपर्यंत जुन्या पद्धती बंद करणे योग्य नसल्याचा ग्राहकांचा सूर आहे

एलपीजी सबसिडी बँक खात्यात ट्रान्सफर होत असताना अनेक ग्राहकांनी बाजारभावाने सिलिंडर घेऊनही सबसिडीची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नव्हती. आधार क्रमांक बँक आणि गॅस एजन्सीकडे अचूक नोंदविल्यावरही ग्राहकांना हा भुर्दंड सोसावा लागला होता. या प्रकरणी ग्राहकांनी संबंधित गॅस कंपनीकडे तक्रार करावी, असे आवाहन पेट्रोलियम कंपन्यांनी केले आहे.

केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर १० मार्चपासून एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आता गॅस एजन्सी व बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न केलेल्या ग्राहकांनाही सबसिडीच्या दरातच गॅस सिलिंडर मिळणार आहे. तसेच या प्रक्रीयेचा पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून मे अखेर तिचा अहवाल येण्याची शक्यता आहे.

आधार संलग्न खात्यात सबसिडी ट्रान्सफर करणे सुरू होते तेव्हा बाजारभावाने सिलिंडर घेऊनही अनेक ग्राहकांच्या बँक खात्यात सबसिडी जमा झालेली नव्हती. त्या सर्वांना पेट्रोलियम कंपन्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या वेबसाइटवर तक्रार नोंदविण्याची सोय आहे किंवा गॅस एजन्सीमधूनही यासंदर्भात कुठे तक्रार करावी याची माहिती मिळू शकेल, असे कंपन्यांनी कळवले आहे

इथेही नोंदवू शकता तक्रार…

इण्डेन गॅस – http://webapp.indianoil.co.in/paribhavam/

भारत गॅस – https://ebiz.bpc.co.in/ccs/LPGWeb.faces

एचपी गॅस – http://jihaan.hpcl.co.in/booking/ComplaintType.aspx

महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...
Tags
Show More
“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close