लाईफस्टाइल

किल्ले वेताळवाडी करिता तोफगाडा

अजय बोराडे सिल्लोड,

प्रतिनिधी : Active न्युज

भराडी येथुन जवळच असलेल्या किल्ले वेताळवाडी येथील तोफेसाठी तब्बल ७० हजार रुपये खर्चून तोफगाडा तयार करण्यात आला आहे. गडकोटांची भूमी असणार्‍या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील ‘वेताळगड’ या डोंगरी किल्ल्यावर ही तोफ असून लाकडाचा वापर करून हा विशेष तोफगाडा बनविण्यात आला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या कन्‍नड विभागातर्फे रविवार, दि. 28 एप्रिल रोजी ही तोफ जैन समुहाचे अध्यक्ष श्री अशोक जैन  , सहयाद्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री श्रमिक गोजमगुंडे यांच्या व सह्याद्री प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी यांच्या ऊपस्थितीत  तोफगाडीवर बसविण्यात येणार आहे.

सदर तोफगाडा सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावचे पदाधिकारी अजय जोशी यांनी बनविला असून यासाठी लागणारे ७०,०००/- रुपयेचा स्वराज्य निधी संस्थेचे महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख प्रकाश नायर यांच्या मित्रांनी केला असून पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तोफगाडा तयार झाला आहे.

स्कॉटलंड येथील तोफगाड्याच्या धर्तीवर बनविण्यात आलेला हा तोफगाडा आहे.

सिल्‍लोड तालुक्यातील  हळदाघाट, हळदागाव मार्गे गेल्यावर पुढे वेताळवाडी घाट लागतो. घाटाच्या ऊजव्या बाजूला वेताळवाडी हा अफाट किल्ला  आहे.  परिसरातच खालच्या बाजूला अडगळीत एक तोफ होती. ती बाहेर काढून तिच्या जतनासाठीची मोहीम सह्याद्री प्रतिष्ठानने होती घेतली आहे.

सागवानी लाकडाचा वापर करून युरोपियन पद्धतीचा तोफगाडा तयार करून घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव यांच्या मदतीने अजय जोशी यांनी हा तोफगाडा तयार केला आहे. या गाड्यावर तोफ बसविण्याच्या ऐतिहासिक कार्यक्रमास शिवप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहान सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करन्यात आले आहेत.

Tags
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close