क्राईममहाराष्ट्र

अवैध्यरीत्या दारू विक्री करणारांवर सिल्लोड पोलिसांची कारवाई

सिल्लोड, प्रतिनिधी :

अजय बोराडे:

Active न्युज

सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी केलेल्या ड्राय डे च्या दिवशी च्या कारवाई चे भराडी, बोरगाव बाजार व परिसरातून स्वागत होताना दिसत आहे. याच प्रमाणे भविष्यात सुद्धा अशा प्रकारची कारवाई चालुच राहील अशी सर्व सामान्य जनता अपेक्षा करीत  आहे..सिल्लोड, तालुक्यातील बोरगाव बाजार, बोरगाव वाडी, भराडी व सिल्लोड-भराडी रस्त्यावरील देवपुजा ढाब्या शेजारी ड्राय डे च्या दिवशी अवैद्य दारू विक्री करणार्‍यांवर पोलिसांनी छापा मारून सहा जणांना पकडले. यात एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात महिलेसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

किशोर पांडुरंग भिसे (35 रा. बोरगाव बाजार) सलीम खॉ बशीर खॉ (35 रा. भराडी) सुरेश हिरालाल मेहर (50 रा. बोरगाव वाडी), सुभाष किसन गायकवाड (45 रा. वांगी), अनिल रामदास राकडे (18 रा. कासोद) व एक महिला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बुधवारी रमजान ईद असल्याने दारूच्या दुकाना बंद होत्या. यामुळे ड्राय डे च्या दिवशी बोरगाव बाजार, बोरगाव वाडी व भराड़ी येथे अवैद्य दारु विक्री केली जात असल्याची माहिती खबर्याने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीवरुण सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल देवीदास जाधव, विलास सोनवणे, भिक्कन सतुके, विठ्ठल चव्हाण यांनी वरील ठिकाणी छापा मारून अवैद्यरित्या दारु विक्री करणाऱ्या सहा जणांना पकडले. त्यांच्या ताब्यातून ५  हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात महिलेसह वरील आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

खुलेआम अवैद्य दारु विक्री

ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये सरकार मान्य देशी दारुचे दूकान नाही, अशा गावात खुलेआम किराणा दूकान, हॉटेल, पान टपरी अशा ठिकाणी अवैद्यरित्या दारुची विक्री केली जाते. ड्राय डे च्या अगोदर अवैद्य दारु विक्रेते दारु साठवून ठेवतात व बंदच्या दिवशी चढ्या भावाने विक्री करतात. ग्रामीण भागात हा प्रकार खुलेआम व सर्रासपणे सुरु आहे. पोलिसांनी या विरोधात वक्रदृष्टी ठेवणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा
Tags
Show More
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close