आता तुमचा आवाज दबणार नाही तुम्हाला खुपकाही सांगावेसे वाटते,खासदार,आमदार,महापौर,आयुक्त आणि नगरसेवक याना सांगूनही प्रश्न सुटला नसेल,शासन,समाज किंवा स्थानिक प्रशासनाला कधी प्रश्न विचारावे वाटतात पण आपलं ऐकेल कोण ? असा प्रश्न पडला असेल... पण आता बिनधास्त राहा तुमचा आवाज आम्ही बुलंद करू, तुम्ही फक्त एवढे करा,काय वाटते ते लिहून काढा आणि 8308444934 वर पाठवा ,योग्य मजकूर प्रकाशित केला जाईल.
क्राईममहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी बबलू शेंगर यास पाच वर्षांचा सश्रम कारावास!

प्रतिनिधी: Active न्युज)

अल्पवयीन मुलीच्या घरात बळजबरीने घुसून तिचा विनयभंग केल्या प्रकरणात तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह रघुनाथसिंह शेंगर (४९) यास गुरुवारी पाच वर्षांचा सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मुलीच्या तक्रारीनुसार, १४ एप्रिल २०१५ रोजी तिचे आई-वडील एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. ती घरात एकटी असताना, आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह रघुनाथसिंह शेंगर याने तिला मोबाइलवरील छायाचित्र दाखविण्याचा बहाणा केला आणि जबरदस्तीने घरात घुसला. घरात घुसल्यावर आरोपीने मुलीला जवळ बोलावून तिचा विनयभंग केला. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह शेंगर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ४५२, सहकलम ७, ८ बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आठ साक्षीदार तपासले. नोंदविलेल्या साक्षी व पुराव्यानुसार न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित त्याला पाच वर्षांचा सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कलम ४५२ नुसार आरोपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ श्याम खोटरे यांनी बाजू मांडली.

“महाराष्ट्रातील लोकप्रिय,रोखठोक,सडेतोड,निःपक्ष निर्भिड, आपल्या हक्काचे व्यासपीठ ➡ Active न्युज” ; पाठपुरावा करणारे .......... .... एकमेव चॅनल ..... Active न्युज, कशाला उद्याची बात……… आता बातमी एका क्षणात……न्याय अधिकारासाठी लढणारे असे एकमेव चॅनल Active न्युज चॅनल. आपल्या शहरात गावात राज्यात काय सुरू आहे?मिळेल बातमी प्रत्येक क्षणाची आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जाणून घेण्यासाठी आजच हा नंबर 8308444934 आपल्या व्हाट्सप ग्रुपमध्ये add करा.
Tags
Show More
महत्वाची सूचना : active न्यूज, चॅनल मध्ये प्रसारीत होणारे विविध विषयांवरील लिखाण, डॉक्युमेंट्री, जाहिराती, विविध मान्यवरांची मते व त्यांच्या लिखाणाशी active न्यूज, चॅनलचे संपादक मंडळ सहमतच असेल असे नाही...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close